Monday, March 24, 2008

एक वर्ष

इथं अमेरीकेत येऊन आत्ता एक वर्ष होत आले !! काळ कसा निघून जातो ते समजत सुध्दा नाही. ध्रुव इथं आला तेव्हा त्याला ईंग्रजी येत नव्हते ... आता त्याला मराठी शब्द आठवून वापरावे लागतात, त्यावरून येणार्‍या वर्षाची / वर्षांची समस्या ... किवां ... मराठी शिकवण्याची गरज़ आत्ताच समोर येऊ लागली आहे.

आज ... एक गोष्ट सांगताना "चिखल" या मराठी शब्दाचा अर्थ विचारल्या वर तो म्हणाला ... " soldiers घालतात ते " ... आणी अर्थ सांगितल्यावर ध्रुव म्हणाला ... "Oh! puddle ..." मला काय बोलावे कळेना. आपण लहान होतो तर मला आठवते आहे ... आपल्याला एखाद्या ईंग्रजी शब्दाचा अर्थ समजल्यावर असा आनंद व्हायचा ... मला कधी आयुष्यात वाटले नव्हतेकी आपल्याला असा अनूभव येईल.

मी 1974 ते 1981, म्हणजे ... जन्मापासून तिसरी पर्यंत सोमवार पेठ, पुणे या पत्त्यावर गेली. मला जेवढे आठवते त्यामधे त्रिशुंड्या गणपती आणी आजुबाजूच्या गल्ल्या हे आमचे क्षेत्रं !!! खेळ ... फर्शीपाणी, चोर पोलीस, विटी दांडू , डब्बा ईपाइस... इत्यादी. क्रिकेट सोमवार पेठेत आठवत नाही ... नंतर विठ्ठलवाडीला आठवते पण सोमवार पेठेत आठवत नाही.

आज ... हे खेळ पुण्यात खेळत असतील का ? माहीत नाही !!!

नवीन भाड्याच्या घरात काल रहायला आलो आहोत. इथं खूप भारतीय दिसतात, दक्षिण भारतीयच जास्त दिसतात. मराठी माणसं मला आजून भेटली नाहीत. 1-2 कुटूंबच भेटली आत्ता पर्यंत. असो.

उद्या पासून कार्यालय पुन्हा सुरू !! आजची सुट्टी संपली :(

4 comments:

Anonymous said...

नमस्कार अमित ! तुमचे ब्लॉग नेहमी वाचायला आवडेल. पण अस वाटतय की परत वर्षा भराणेच वाचायला मिळेल की काय ?
- श्याम नंदनवार

ashok said...

Jai Hari Amit
tumacha blog chyan ahe marathicha swabhiman tumhi Americketahi japat ahat , anand watla tumhi asech blog lihit ja saunskritik(Cultural)articles suddha lihit raha .mi kirtankar ahe (Ashokanand Maharaj Kardile) maze pravachanache 30 clips you tube maddhe ahet next Url
5
http://video.aol.com/video-detail/bhagawat-geeta/226... (Hide)
4
http://in.search.yahoo.com/search?ei=utf-8&fr=sl... (Hide)
3
http://video.aol.com/video-detail/bhagawat-geeta/226... (Hide)
2
http://www.jagranchannel.com/animation.html (Hide)
2
http://in.truveo.com/Bhagwat-Gita-Introduction-Part-... (Hide)

http://in.youtube.com/watch?v=cDXEfa1DnJ8
(Thoughts of Gurumai is my blog u could read these thouhts also and send me ur comment.)

Anonymous said...

hey,nice blog..
me too from Atlanta,
and I also didn;t find any maharashtrian ppl

अमित कुलकर्णी said...

मला माझा ब्लॉग लिहावयास आताशा वेळ मिळत नाही .. आम्हाला गणपतीं बसायच्या आधी ऍटलांटा महाराष्ट्र मंडळ सापडले त्यांचे संकेत स्थळ हे आहे : http://www.mmatlanta.org/