Wednesday, May 23, 2007

साप !! साप !!!

आज कार्यालयातुन येताना, आमच्या घरा जवळ रस्त्यावर मला एक साप दिसला, छोटा साच होता. चोकलेटी रंगाचा.

पटकन घरी येऊन कॅमेरा घेऊन चार - पाच फोटो काढले !!! मी आज पहिला अमेरिकन सापाचा फोटो काढला. आणि आत्ता पर्यंत दोन अमेरिकन साप मी पाहिले आहेत (रस्त्यावर). पहीला नियागरा फॉल्स पाशी गेल्या वर्षी आणि आज आटलांटा मधे.

इथ फोटो लावत आहे. हा साप बिनविषारी असुन साधारण 1 फूटा पर्यंत वाढतो. याच खाद्य .. बेडूक, सरडे वगैरे छोटे प्राणी.
इथ नेहमी अढळणारा हा एक छोटा साप.


1 comment:

xetropulsar said...

आमच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये हिरवळीत मागच्या वर्षी मला एक साप मिळाला होता Opheodrys या प्रकारातला हिरवा साप. पण अमेरिकेत साप म्हणजे जरा अनपेक्षितच होतं. प्राणीजीवनाची एकूणच बोंब आहे इकडे.