Monday, August 11, 2008

नवीन छंद .. मासे पक़डणे !!

इथं ऍटलांटा मधे आता मी मासे पकडायला लागलो आहे. म्हणजे ... मासे पकडायला गेलो तर मला 4 पैकी 2 वेळेला तरी मासे मिळतात. छान पैकी ताजे मासे खायला मजा येते. इथं ट्राऊट मासे नदी मधे मिळतात... मासे पकडण्या साठी बरीच छंदीस्त मंडळी इथं नदी वर येतात ... आणि त्या लोकाना मासे पक़डण्या करता सरकार मस्य उद्योगात माश्याची पैदास करून नदी मधे सोडते. सरकार या सेवे करता मासे पक़डण्याचा परवाना विकते. (म्हणजे मासे नदीत आहेत याची काळज़ी सरकार घेते)

असो... तर इथे मासे पक़डण्याचे दोन प्रकार प्रचलीत आहेत


1. बेट फिशींग (bait fishing)
या प्रकारात गळाला जिवंत आळी / किडेलावून अथवा इतर खाद्य / क्रुत्रिम खाद्य लावून मासे आकर्षीत केले जातात,
आणि या प्रकारात गळाला लावलेल्या आकर्षणाला वजन असते. या वजना मुळे मासे पकडण्यांचा गळ पाण्यात दुर वर फेक़ूशकतो... मी जास्त भौतिकात जात नाही ते नंतर कधी तरी लिहिन.


2. फ्लाय फिशींग (fly fishing)
या प्रकारात गळाला पिसे/दोरे बांधून क्रुत्रिम किडे बनवतात आणि ते मासे पक़डायला वापरतात. या किड्यांना काही वजननसते. हा मासे मारण्याचा प्रकार त्याच्या मागच्या भौतिक विज्ञाना मुळे अवघड आहे. गळाला वजन नसल्या मुळे ...
मासे पक़डण्याची दोरी फेकावा लागते.... दोरी दुरवर फेकणे जरा अवघड असते. त्याकरता वेग़ळी दोरी मिळते.

मी आधी "बेट फिशींग" या प्रकारानी सुरवात केली नंतर आताशा फ्लाय फिशींगचं करतो. त्यात एक वेग़ळीच मज़ा/नशा आहे.



हे माझे छायाचित्र बेट फिशिंग करतानाचे आहे ... फ्लाय फिशींगचे छायाचित्र आजून काढले नाहीये.

2 comments:

Yawning Dog said...

छानच आहे पोस्ट, मस्त माहिती मिळाली - मासे पकडण्याचे पण प्रकार असतात हे माहिती नव्हते.

"... मी जास्त भौतिकात जात नाही ते नंतर कधी तरी लिहिन..."

नंतर कधी तरी नको लवकरात लवकर लिही :)

अमित कुलकर्णी said...

मासे पकडण्याचे प्रकार अनेक आहेत ... मी जे दोन प्रकार लिहीले ते प्रचलित प्रकार होत...

इथे लोक नुसत्या हातानी सुध्धा मासे (कॅट फिश) पकडतात त्याला नुडलींग (noodling) असे म्हणतात (मी त्याला वेडेपणा असे म्हणेन). तसेच धनुष्यबाण अथवा भाला वापरून मासे मारण्याचा पण एक प्रकार आहे. जॉर्गिया मधे एकाच ठिकाणी धनुष्यबाणाने मासे मारायची परवानगी आहे.

जाळे टाकून मासे पकडणे हे व्यवसाईक लोक करतात.