Saturday, December 13, 2008

हिंदी ते इग्रजी गुगल -- भाषांतर

आज सहज इटरनेट वर हे नवीन खेळणं सापडलं 


या तंत्रज्ञानाने भाषांतर केलेल्या काही हिंदी गाण्यांच्या ओळी:

1. हम बेखुदी मे तुम को पुकारे चले गये 
We senselessness in the calls you've gone

2. दीवानालेके आया है दिल का तराना 
Diwanaleke has come to the heart of the song

3. इतना तो याद है मुझे के उनसे मुलाक़ात हुई              
बाद में जाने क्या हुआ, ना जाने क्या बात हुई 
I remember him much of the meeting, 
After going into what happened, not what happened
4. ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिये
Take a bath with cold water and cold

5. नीला आसमां सो गया
Blue sky was asleep

हे तंत्रज्ञान वापरून थक्क झालो, पोटभर हसलो ... आणि उगाच खूप वेळ जागलो. 
असो .. तुम्ही पण वापरून पहा!!

Monday, August 11, 2008

नवीन छंद .. मासे पक़डणे !!

इथं ऍटलांटा मधे आता मी मासे पकडायला लागलो आहे. म्हणजे ... मासे पकडायला गेलो तर मला 4 पैकी 2 वेळेला तरी मासे मिळतात. छान पैकी ताजे मासे खायला मजा येते. इथं ट्राऊट मासे नदी मधे मिळतात... मासे पकडण्या साठी बरीच छंदीस्त मंडळी इथं नदी वर येतात ... आणि त्या लोकाना मासे पक़डण्या करता सरकार मस्य उद्योगात माश्याची पैदास करून नदी मधे सोडते. सरकार या सेवे करता मासे पक़डण्याचा परवाना विकते. (म्हणजे मासे नदीत आहेत याची काळज़ी सरकार घेते)

असो... तर इथे मासे पक़डण्याचे दोन प्रकार प्रचलीत आहेत


1. बेट फिशींग (bait fishing)
या प्रकारात गळाला जिवंत आळी / किडेलावून अथवा इतर खाद्य / क्रुत्रिम खाद्य लावून मासे आकर्षीत केले जातात,
आणि या प्रकारात गळाला लावलेल्या आकर्षणाला वजन असते. या वजना मुळे मासे पकडण्यांचा गळ पाण्यात दुर वर फेक़ूशकतो... मी जास्त भौतिकात जात नाही ते नंतर कधी तरी लिहिन.


2. फ्लाय फिशींग (fly fishing)
या प्रकारात गळाला पिसे/दोरे बांधून क्रुत्रिम किडे बनवतात आणि ते मासे पक़डायला वापरतात. या किड्यांना काही वजननसते. हा मासे मारण्याचा प्रकार त्याच्या मागच्या भौतिक विज्ञाना मुळे अवघड आहे. गळाला वजन नसल्या मुळे ...
मासे पक़डण्याची दोरी फेकावा लागते.... दोरी दुरवर फेकणे जरा अवघड असते. त्याकरता वेग़ळी दोरी मिळते.

मी आधी "बेट फिशींग" या प्रकारानी सुरवात केली नंतर आताशा फ्लाय फिशींगचं करतो. त्यात एक वेग़ळीच मज़ा/नशा आहे.



हे माझे छायाचित्र बेट फिशिंग करतानाचे आहे ... फ्लाय फिशींगचे छायाचित्र आजून काढले नाहीये.

Monday, March 24, 2008

एक वर्ष

इथं अमेरीकेत येऊन आत्ता एक वर्ष होत आले !! काळ कसा निघून जातो ते समजत सुध्दा नाही. ध्रुव इथं आला तेव्हा त्याला ईंग्रजी येत नव्हते ... आता त्याला मराठी शब्द आठवून वापरावे लागतात, त्यावरून येणार्‍या वर्षाची / वर्षांची समस्या ... किवां ... मराठी शिकवण्याची गरज़ आत्ताच समोर येऊ लागली आहे.

आज ... एक गोष्ट सांगताना "चिखल" या मराठी शब्दाचा अर्थ विचारल्या वर तो म्हणाला ... " soldiers घालतात ते " ... आणी अर्थ सांगितल्यावर ध्रुव म्हणाला ... "Oh! puddle ..." मला काय बोलावे कळेना. आपण लहान होतो तर मला आठवते आहे ... आपल्याला एखाद्या ईंग्रजी शब्दाचा अर्थ समजल्यावर असा आनंद व्हायचा ... मला कधी आयुष्यात वाटले नव्हतेकी आपल्याला असा अनूभव येईल.

मी 1974 ते 1981, म्हणजे ... जन्मापासून तिसरी पर्यंत सोमवार पेठ, पुणे या पत्त्यावर गेली. मला जेवढे आठवते त्यामधे त्रिशुंड्या गणपती आणी आजुबाजूच्या गल्ल्या हे आमचे क्षेत्रं !!! खेळ ... फर्शीपाणी, चोर पोलीस, विटी दांडू , डब्बा ईपाइस... इत्यादी. क्रिकेट सोमवार पेठेत आठवत नाही ... नंतर विठ्ठलवाडीला आठवते पण सोमवार पेठेत आठवत नाही.

आज ... हे खेळ पुण्यात खेळत असतील का ? माहीत नाही !!!

नवीन भाड्याच्या घरात काल रहायला आलो आहोत. इथं खूप भारतीय दिसतात, दक्षिण भारतीयच जास्त दिसतात. मराठी माणसं मला आजून भेटली नाहीत. 1-2 कुटूंबच भेटली आत्ता पर्यंत. असो.

उद्या पासून कार्यालय पुन्हा सुरू !! आजची सुट्टी संपली :(